लोकशाहीचे हनन करण्याची इच्छा असलेले हे सरकार गेलेच पाहिजे!
सरकार विरोधातील चर्चा समाजातील सर्वच स्तरांतून आज ऐकू येऊ लागली आहे. प्रत्युत्तर म्हणून 'हे नकोत तर मग कोण?' असे प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. पण या देशाच्या लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. इथल्या सामान्य मतदारांच्या निर्णयक्षमतेबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. पण त्याआधी लोकशाहीचे हनन करण्याची इच्छा असलेले हे सरकार गेलेच पाहिजे, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे.......